Ambabai(mahalaxmi) Rathostav 2023 | Ambabi | Mahalaxmi #mahalakshmi #kolhapur #comment
Hellow guys, Welcome to my website, and you are watching Ambabai(mahalaxmi) Rathostav 2023 | Ambabi | Mahalaxmi #mahalakshmi #kolhapur #comment. and this vIdeo is uploaded by VAM Photo Studio at 2023-04-09T03:35:31-07:00. We are pramote this video only for entertainment and educational perpose only. So, I hop you like our website.
Info About This Video
Name |
Ambabai(mahalaxmi) Rathostav 2023 | Ambabi | Mahalaxmi #mahalakshmi #kolhapur #comment |
Video Uploader |
Video From VAM Photo Studio |
Upload Date |
This Video Uploaded At 09-04-2023 10:35:31 |
Video Discription |
Ambabai(mahalaxmi) Rathostav 2023 | Ambabi | Mahalaxmi #mahalakshmi #kolhapur
श्री अंबाबाई (महालक्ष्मी ) रथोत्सव 2023
#चांदणे_शिंपीत_जाशी_चालता_तू_चंचले_ओंजळी_उधळीत_मोती_हासरी_ताराफुले*
ही ओळ ऐकली की का कुणास ठाऊक माझ्या डोळ्यासमोर करवीर निवासिनी च्या रथोत्सवा दिवशीची संध्याकाळी उभे राहते. जगदंबेचा रथोत्सव म्हणजे फक्त एक धार्मिक समारंभ नसतो तर तो कोल्हापूरच्या सगळ्या संस्कृतीची एक झलकच असतो. संध्याकाळी चार वाजले की हळूहळू महाद्वार रस्ता गुजरी भावसिंगजी रस्ता भवानी मंडप म ल ग हायस्कूल, मिरजकर तिकटी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग ( नूतन मराठी विद्यालय ते बिनखांबी गणपती मंदिर) महाद्वार रस्ता हा सगळा मार्ग लोक स्वयंस्फूर्तीने बंद करतात, आपापल्या परीने सडा घालून पाणी मारून स्वच्छ करून घेतात आणि हा सगळा मार्ग क्षणात अनेक रंगावलीकारांच्या कॅनव्हास च रूप घेतो. जसं जसा अंधार पडू लागतो तसा विद्युत रोषणाई ने सगळा परिसर उजळून निघतो.
सुंदर सजवलेला आणि एरव्ही रामाच्या पाराजवळ असलेला रथ ( यंदा जुना रथ जीर्ण झाल्याने नव्या सागवानी लाकडात घडवलेला सुंदर रथ तयार केला आहे नुकताच तो जगदंबा चरणी अर्पण करण्यात आला) आणून महाद्वारावर उभा केला जातो. एकीकडे रथाची सजावट सुरू होते तर दुसरीकडे रथोत्सवाचा मार्ग रांगोळ्यांनी सजलेला असतो ते बघायला भाविकांची दाटी होते. आठच्या सुमाराला चोपदारांची ललकारी होऊन सनई ताशांच्या निनादात श्रीपूजक अंबाबाई ला रथावर घेऊन येतात. तिच्या पाठोपाठ हवालदार खांडेकर जाप्त्यावरचे पारंपरिक दागिने घेऊन हजर होतात. मग सुरू होतो त्रिभुवन सुंदरी चा शृंगार . दृष्ट लागण्यासारखं रूप पूजारी आपल्या हाताने साकारतात. एव्हाना नऊ वाजत आलेले असतात. भक्तांच्या घरच्या आरत्या यायला सुरुवात होते. पुजारी आरती ओवाळून प्रसाद देतात. आता रथाचे जू धरून भाविक विशेषतः युवा वर्ग उभा असतो. इतक्यात साडे नऊ ला तोफेची सलामी होते आणि नवकोट नारायणी..... श्रीमहालक्ष्मी अशी चोपदारांची ललकारी घुमते आणि रथ चालू लागतो. गुलालाची उधळण अंबामाता की जय चा घोष अखंड सुरू होतो. या रथाला जिथे भाविक विनंती करतात तिथे थांबून भाविकांची आरती स्विकारली जाते. हळूहळू रथ पुढे सरकतो तशी आतषबाजी रोषणाई आसमंत उजळून टाकत असते. वाद्यांचा निनाद, स्तोत्रांचे स्वर धुपाचा दरवळ वातावरण भारून टाकतो . गुजरी कॉर्नर च्या चौकातून रथ अलगद गुजरीत वळवला जातो. संपन्न नगरीतून वैभवाची देवता आशिर्वादाची खैरात करत निघते. पुन्हा भावसिंगजी रस्त्याला रथ येतो आता जगदंबे च नवं रूप समोर येतं एका सार्वभौम राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपतींच्या राजधानीची शौर्यशाली वैभवशाली नगरदेवता! रथ नगारखाना ओलांडून भवानी मंडपात येतो . महाराज छत्रपतींचा चोपदार महाराजांच्या नावाची ललकारी देतो पाठोपाठ हुजूरस्वारीच आगमन होतं . महाराज देवीचं पंचोपचार पूजन करतात आरती होते. आणि पुन्हा ललकारी होऊन रथ मार्गस्थ होतो . आता म.ल.ग हायस्कूल बालगोपाल तालिम मिरजकर तिकटी मार्गे रथ नूतन मराठी शाळेसमोर येतो. पाठकांच्या घरासमोर रथ येताच चोपदार रोषणनाईक रथावरुन उतरतात आणि रंकोबाच्या देवळात जातात. इथ रंकभैरव कोल्हापूर चा कोतवाल जणू अंबाबाई च्या निरोपाचीच वाट बघत सदरेवर बसलेला असतो. महालक्ष्मी च्या चोपदारांनी ललकारी देताच रंकोबा आपल्या देवळात जातो. पुन्हा दर्शन करून हा लवाजमा बिनखांबी गणपती कडे जातो तिथही अशीच पंचोपचार पूजा ललकारी होऊन चोपदार रथावर येतात. आता रथ महाद्वारावर आणला जातो. मध्यरात्र होते पण उत्साह तोच असतो. वांगी बोळाचा कोपरा ओलांडताच रथाला वेग येतो. आणि त्याच गतीत रथाचे जू महाद्वारासमोर ठेवले जातात. कदम घराण्यातील स्त्रीया पारंपारिक मानाप्रमाणे दृष्ट काढतात. एव्हाना श्रीपूजक पालखी घेऊन येतात. रथावरून उतरलेली महालक्ष्मी(अंबाबाई)पालखीत बसते. एवढ्या रात्री दिपमाळा उजळलेल्या असतात. परंपरेप्रमाणे अगस्तींच्या दिपमाळेला प्रदक्षिणा करून सात टप्प्यांवर गायन सेवा घेऊन अंबाबाई सदरेवर येते. भक्तांना आशिर्वाद देते तोफेची सलामी होताच मंदिरात जायला निघते. पालखी बालदत्ताजवळ क्षणभर थांबते नैवेद्याच्या पूर्ण पानानं देवीची ओवाळणी होते आणि आई गाभाऱ्यात जाते कापूरारती शंखतीर्थ होऊन सोहळा संपतो तो मनामधे या रथोत्सवाच्या स्मृती ठेवूनच
मातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीक
Mahalkshami mandir,mahalakshami rathotsav,rathatostav,rath,mahalkshmi rath,shree mahalakshmi,shre mahalakshmi mandir,panchaganga mahalkshmi,mahalakshmi temple,mahalakshmi rathotsav,kolhapur tourism,kolhapur mahalakshmi,mahalkshmi mandir,
kolhapur mahalakshmi rathotsav,kolhapur atraction,kolhapuri misal,kolhapuri kusti,kolhapuri bhel,kolhapuri tadaka,aapal kolhapur |
Category |
Film & Animation |
Tags |
Ambabai(mahalaxmi) Rathostav 2023 | Ambabi | Mahalaxmi #mahalakshmi #kolhapur | ambabi | mahalaxmi | rath | rathostav | 2023 | aai | mata | amba | tuljabhavi | bhavanimandap | raje | shahajiraje |
More Videos